सोमवार, २९ जून, २०२०

इथले लोक व झेंडा

 इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोकं राहतात . आता आपण त्यांनाच भेटूया ना !

शीर्षासक  : ही लोकं आपल्यासारखीच असतात पण ते छ्ताला पाय लावून चालतात . म्हणजे आपल्या उलटं !                  या लोकांकडे इतर कोणत्याही जादुई शक्ती नसतात उलटं चालणं सोडून . 

हिमिल  : हे लोक मधमाशांपेक्षा थोडेसे मोठे असतात . हे लोक झाडावर साठलेल्या बर्फामध्ये घरं करून                            राहतात . हे बर्फाचं रूप घेऊन इतर लोकांपासून स्वतःचा बचाव करतात आणि त्यांच्या शरीरातून                गारवा येतो त्यामुळे उन्हाळ्यात बर्फ वितळत नाही 

वृक्षक :     ही लोकं साधारण दिसायला आपल्यासारखीच असतात पण हिवाळ्यात ते झाडांचं रूप घेतात .                 त्यांना वेगळं अन्न मिळवावं लागत नाही कारण त्यांना प्रकाशसंश्लेषण करता येतं . ते २०००० वर्ष                जगू शकतात .
 हे तिथले मूळ रहिवासी (जास्त प्रमाणात राहणारे लोक ) आहेत . जसे जसे तुम्ही हे जग बघाल तशी तशी तुमची इतर रहिवाश्यांशी ओळख होईल . 


आमचा झेंडाया झेंड्याचा अर्थ :आपल्याकडे झेंड्यांना जसे महान अर्थ असतात तसा या झेंड्याला  काहीही अर्थ नाहीये . तिथल्या एका चित्रकाराने हे चित्र काढलं आणि ते जगातल्या सगळ्यांना आवडलं म्हणून त्यांनी याचा झेंडा बनवला . 
( पुढे याच चित्रकाराला YESBELLपुरस्कार देऊन गौरवण्यात आले ) 

 

१३ टिप्पण्या:

  1. भारीच वाटलं ग वाचून... कुठेतरी लहानपण आठवायला लागलंय.. मी नारद मंदिराच्या कट्ट्यावर बसून खूप कल्पना रंगावयाची.. पण शब्दात कधी मांडताच आल्या नाहीत

    उत्तर द्याहटवा
  2. Farach bharii..describe khup chan kela aahes....lavkar pudhchi post tak.vat baghat aahe.

    उत्तर द्याहटवा
  3. Ruhul तुझी विचार शक्ती फारच वेगळी आहे असच लेखन जोमाने सुरू ठेव

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम!! प्रशंसा करायला शब्द कमी आणि तुझ्या सारखी विचार शक्ती पण कमी. इथूनच टाळ्या वाजवतो आणि तुझ्या ह्या साहसाला मानाचा मुजरा.

    उत्तर द्याहटवा
  5. रुजूल तुझी वैचारीक पात्रता खुप निराळी आहे,तू लिहिलेले वाचताना मी त्या विश्वात गेले.खुप खुप शुभेच्छा..

    उत्तर द्याहटवा
  6. मीनू मावशी (ईशान आणि मिहिर सोबत) : तुझ्या काल्पनिक जगातले लोक फारच मजेशीर आहेत. वाचून मस्त वाटलं, खूप आवडलं.
    माझ्या भाच्यांना सुद्धा खूप मज्जा आली. तुला खूप खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  7. Pooja Randive...khup mast ani ekdm vegal tyamule vachayla majja yete...vachtana mlahi lahan zalyasarkh vatat

    उत्तर द्याहटवा