सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

💣 कंटाळ्याचे महायुद्ध आणि केकीन:

 

कंटाळ्याचे महायुद्ध:

हे महायुद्ध परवा संपले.( त्यांच्या परवा म्हणजे २०० वर्ष आधी. ) हे युद्ध कंटाळा विरुद्ध या जगातील लोक असे झाले होते. कंटाळा आला, त्यांच्या जगात जन्माला! त्यांच्या जगात स्थायुरूप होता तो. पहिल्यांदा युद्ध न करता त्यांनी दार उघडून त्याला आपल्या ( माणसांच्या ) जगात पाठवलं होतं. एक महिना आधी त्याला इथे राहायचा कंटाळा आला म्हणून त्यांच्या जगात म्हणजे तो जिकडे जन्माला आला होता तिकडे परत गेला. आता मात्र हीमिलाना खूपच राग आला. त्यांनी ही बातमी सर्वांना कळवली. मग त्यांनी ठरवलं, कंटाळा आपल्या जगात येऊ नको सांगूनही दुसऱ्यांदा आलेला आहे. आता मात्र आपल्याला त्याच्याशी युद्ध करावे लागेल.

त्यांची रणनीती अशी होती की, सगळ्यात आधी हीमील आणि वृक्षकांनी आधी जमिनीवर लक्ष वेधून घ्यायचं. मग वरून शीर्षासक येणार आणि कंटाळ्याला हळूच उचलून आपल्या ( माणसांच्या ) जगात सोडणार. सगळे ठरल्याप्रमाणे झाले.(म्हणूनच आता २०० वर्षांपासून आपल्याला जरा जास्तच कंटाळा यायला ,लागला आहे . ) 

 पण कंटाळ्याला बाहेर सोडताना केकीन नामक प्रजाती हळूच आत घुसली.

केकीन :

हे लोक पाणी पीत नाहीत आणि अन्न सुद्धा खात नाहीत. या ऐवजी ते हवेतील बाष्प पितात आणि ऊन खातात. त्यांनी सात वेळा बाष्प प्यायलं आणि पाच वेळा ऊन खाल्लं की ते मरतात. पण त्यांना दहा वर्षात एकदाच खायला लागत आणि दोनदा पाणी प्यायला लागत . त्यांची घरं झाडांच्या पानांमध्ये असतात. त्यांना पाच पिवळ्या अँटिना असतात ज्या सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि सात निळ्या अँटिना असतात ज्या बाष्प शोषून घेतात. हे लोक स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सूर्यप्रकाशात किंवा बाष्पात रूपांतरित होऊ शकतात. 

 आता हे लोक सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहतात . 


या  जगाची कालगणना आपण लवकरच बघू . 

४ टिप्पण्या: