सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

📅 येथील कालगणना :

इथे काळ कधीच पुढे सरकत नाही . याउलट इथे काळ थांबतो आणि माणसं काळाच्या पुढे जातात . म्हणजे तिथे एका सिलिकाच्या गळ्याभोवती सगळे काळ फिरत असतात . असे ९९९९९९९९९ एवढे गोळे आत्तापर्यंत  अस्तित्वात आहेत .इथे आपण आपल्याला हव्यात्या काळात जगू शकतो . पण या काळातून त्या काळात आपण  संपर्क साधू शकत नाही . या जगाचा  इतिहास इतिहास शोधून काढताना भरपूर शास्त्रज्ञांनी या कलेचा वापर केला आहे . पण जर इथल्या लोकांना प्रजनन करायचे असेल तर मात्र आपण जन्मतो त्याच काळात फक्त प्रजनन करता येतं . इथे दर १० वर्षांनी एक नवा कालखंड तयार होतो . एका गोळ्याभोवती २००० काळ फिरू शकतात . हे सगळे सिलिकाचे गोळे सूर्याच्या गाभ्यात ठासून भरलरेल असतात आणि प्रत्येक काळात ९९९९ सूर्य असतात . पण या काळातून त्या काळात जायचं असेल तर खूप ट्रेनिंगची गरज असते कारण इतके कालखंड असतात की कुठले कालखंड कुठले आहेत हे कळायला तर पाहिजे ना ! इथे कोणाचाच वाढदिवस साजरा केला जात नाही . खरं म्हणजे इथल्या लोकांना ' वाढदिवस म्हणजे काय ' हेच माहित नाहीये . इथे एक कालखंड ५ वर्षांचा असतो आणि एका युगात ९९९९९९९९९९ वर्ष असतात . पण इथे  भविश्यात डोकावूनबघायचं असतं तेव्हा १० वर्षांच्या ऍडव्हान्स ट्रेनिंगची आवश्यकता असते  नाहीतर आपण तो काळ येईपर्यंत तिथे अडकून पडण्याची दाट शक्यता असते .

४ टिप्पण्या: