सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

सुरुवात व सांगता

 या काल्पनिक जगाची सुरुवात मैदानाने होते आणि सांगता पर्वतांनी . तसेच येथील रहिवास्यांचे रहाण्याचे क्रम आहेत . सर्वात आधी तुम्हाला शिर्षासक दिसतील . ते तिथे राहतात कारण ते उलटे चालत असताना जमिनीवर असले तर त्यांच्या डोक्याला लागून इजा होऊ शकते . मैदानानंतर डोंगरउतार लागतो . तिथल्या झुडुपांच्या पानांमध्ये तुम्हाला केकिनांचे भरपूर कोष दिसतील . त्यांनी इथे राहायचं कारण असं की इथे भरपूर सूर्यप्रकाश आणि बाष्प जमिनीतून उत्पन्न होतं . मग त्याच डोंगरांवरती पठारांवर वृक्षक राहतात . [ म्हणजे इथे ते प्रकाशसंस्लेशन करायला शिकण्यापुरतेच . नंतर ते कायमचे बाहेर पडतात . ] मग डोंगरांच्या शिखरांवर हिमिल राहतात कारण तिथली हवा थंड असते . आणि पुढे कित्येक किलोमीटर ओसाड पर्वतरांगा आहेत आणि त्यांनतर पुढच्या पर्वतरांगेत राहतात मीनामा . हे आग उत्पन्न करू शकत असल्याने ते बर्फातही जिवंत राहू शकतात . 

४ टिप्पण्या: