मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

​💀धोका​ ​

​कोप नावाचा इथे एक क्रॉसब्रीड प्राणी शास्त्रज्ञानीं बनवलेला आहे . सध्या तरी हा प्राणी पाळण्यात धोका आहे कारण ​हा प्राणी सूर्यप्रकाश खातो आणि काळ खातो . त्यामुळे इतर सगळेच लोक मरू शकतात​​​ आणि जग नष्ट होऊ शकतं . आणि​ हा प्राणी पिसाळला कि तो कशाचीही धूळ बनवू शकतो . ​ या प्राण्याचा आकार ​बोल ​सरोवरापेक्षा मोठा आहे​[​सगळ्यात​ मोठं सरोवर ]​ व तो दर सेकंदाला १ असे प्रजनन करतो . सध्या या प्राण्याचं प्रजनन थांबवलेलं आहे व त्याला नष्ट करायचे प्रयत्न चालू आहेत .​ त्यामुळे सध्या इथेही लॉकडाऊन ​ आहे ​. 



कोप ​फोटो ​





सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

सुरुवात व सांगता

 या काल्पनिक जगाची सुरुवात मैदानाने होते आणि सांगता पर्वतांनी . तसेच येथील रहिवास्यांचे रहाण्याचे क्रम आहेत . सर्वात आधी तुम्हाला शिर्षासक दिसतील . ते तिथे राहतात कारण ते उलटे चालत असताना जमिनीवर असले तर त्यांच्या डोक्याला लागून इजा होऊ शकते . मैदानानंतर डोंगरउतार लागतो . तिथल्या झुडुपांच्या पानांमध्ये तुम्हाला केकिनांचे भरपूर कोष दिसतील . त्यांनी इथे राहायचं कारण असं की इथे भरपूर सूर्यप्रकाश आणि बाष्प जमिनीतून उत्पन्न होतं . मग त्याच डोंगरांवरती पठारांवर वृक्षक राहतात . [ म्हणजे इथे ते प्रकाशसंस्लेशन करायला शिकण्यापुरतेच . नंतर ते कायमचे बाहेर पडतात . ] मग डोंगरांच्या शिखरांवर हिमिल राहतात कारण तिथली हवा थंड असते . आणि पुढे कित्येक किलोमीटर ओसाड पर्वतरांगा आहेत आणि त्यांनतर पुढच्या पर्वतरांगेत राहतात मीनामा . हे आग उत्पन्न करू शकत असल्याने ते बर्फातही जिवंत राहू शकतात . 

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

हक्क व कर्तव्ये : संविधान २

 हक्क :


१. बार्गेनिंग करणे.    

२. बोलणे.

३. जेवणे.

४. झोपणे .

५. चालणे / पळणे .

 

कर्तव्ये :

१. हळू आवाजात बोलणे .

२. वेळेवर कामं करणे . 

३. सगळ्यांशी चांगलं वागणे . 




             [ हे नियम काळ - वेळ , वय - वर्ष न बघता सरसकट ० ते १००००००० वर्षांच्या लोकांना लागू आहेत . ] 


                                                [ ही कर्तव्ये आणि हक्क लोकांनी मिळून ठरवले आहे . ]


सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

📕संविधान📕

 इथे संविधान लिहिण्याचा कार्यक्रम चालू होता त्यामुळे गेले काही दिवस ते आपल्याला माझ्या जगात फिरकू देत नव्हते आणि त्यांनी सांगितलं आहे कि पुन्हा हे जग बघायला येण्याआधी संविधान वाचणं पर्यटकांना सक्तीचे आहे . यांच्या संविधानात ५च कायदे आहेत . 

नियम :
१. घरांची संख्या ५ पेक्षा जास्त ठेवायची नाही .                                           दंड = ४००
२. काळलायसेन्स मिळेपर्यंत भूत / भविष्यकाळात जायचं नाही .                    दंड =३००
३. पर्वांगीशिवाय ताठकण्याचा मानव पाळायचा नाही .                                  दंड =७५
४. नोपार्किंगमध्येच वाहने पार्क करायच                                                     दंड = ४०.५ 
५. चोरी , खून , गुन्हेगारी करायची नाही .                                                   दंड = १००,००,

​नशिबाने अजून कोणी कायदे न तोडल्याने बामो [ तिथले पोलीस ] जरा नाखूष आहेत . ​आणि तुम्हीही तोडू नये हि विंनती ​

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

🚀 पृथ्वीवर पाठवलेलं यान 🚀

आजच पोलोड नामक स्पेस कंपनीने पृथ्वीयान९९९ लॉन्च केले . या यानाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या यानाला पृथ्वी नामक ग्रहाचे फोटो काढता येणार नाहीयेत . पण या यानाला खरे खुरे डोळे व तोंड दिले आहे अणि यान जे बोलेल , बघेल ते त्याक्षणी इथल्या अभ्यासकांना दिसणार व ऐकू येणार आहे ! हे यान बनवण्यात २००हिमिल , २०० वृक्षक ,२०० केकीन व २०० शिर्षासक सहभागी होते . या यानाचे मेन 'ku.पेलेड' होते . [ ku म्हणजे kupul . ही तिथल्या शास्त्रज्ञांची सगळ्यात मोठी पदवी आहे . ] हे यान ५० वर्षांने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार आहे . या कामासाठी ५-५ वर्षांचं अंतर असलेल्या पिढीला यानावर लक्ष ठेवायला नेमलेलं आहे . १० वर्षांने एक जनरेशन रिटायर होणार आहे . या यानाचे मटेरियल हिमिलांचा न वितळणारा बर्फ आणि वृक्षकांचं न तुटणारं लाकूड यांचं मिक्शर करून बनवले आहे आणि मिनामांकडून लागलेली आग वापरून हे पार्टस फिट केले आहेत .या यानानंतर आपण यानातून लोकांना पाठवू शकू असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे . आणि पृथ्वीवरच्या माणसांनी बनवलेल्या यानासारखे याचे पार्टस् ही गळून पडणार नाहीयेत ! हे यान १सेकेंडत ५५५५ किलोमीटर अंतर कापू शकतं .     


-------------------------------------------------------------------------------------------------------------

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

📅 येथील कालगणना :

इथे काळ कधीच पुढे सरकत नाही . याउलट इथे काळ थांबतो आणि माणसं काळाच्या पुढे जातात . म्हणजे तिथे एका सिलिकाच्या गळ्याभोवती सगळे काळ फिरत असतात . असे ९९९९९९९९९ एवढे गोळे आत्तापर्यंत  अस्तित्वात आहेत .इथे आपण आपल्याला हव्यात्या काळात जगू शकतो . पण या काळातून त्या काळात आपण  संपर्क साधू शकत नाही . या जगाचा  इतिहास इतिहास शोधून काढताना भरपूर शास्त्रज्ञांनी या कलेचा वापर केला आहे . पण जर इथल्या लोकांना प्रजनन करायचे असेल तर मात्र आपण जन्मतो त्याच काळात फक्त प्रजनन करता येतं . इथे दर १० वर्षांनी एक नवा कालखंड तयार होतो . एका गोळ्याभोवती २००० काळ फिरू शकतात . हे सगळे सिलिकाचे गोळे सूर्याच्या गाभ्यात ठासून भरलरेल असतात आणि प्रत्येक काळात ९९९९ सूर्य असतात . पण या काळातून त्या काळात जायचं असेल तर खूप ट्रेनिंगची गरज असते कारण इतके कालखंड असतात की कुठले कालखंड कुठले आहेत हे कळायला तर पाहिजे ना ! इथे कोणाचाच वाढदिवस साजरा केला जात नाही . खरं म्हणजे इथल्या लोकांना ' वाढदिवस म्हणजे काय ' हेच माहित नाहीये . इथे एक कालखंड ५ वर्षांचा असतो आणि एका युगात ९९९९९९९९९९ वर्ष असतात . पण इथे  भविश्यात डोकावूनबघायचं असतं तेव्हा १० वर्षांच्या ऍडव्हान्स ट्रेनिंगची आवश्यकता असते  नाहीतर आपण तो काळ येईपर्यंत तिथे अडकून पडण्याची दाट शक्यता असते .

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

ताज्या बातम्या

 पीकी न्यूज चॅनल 


 १. कालच चीविल नामक प्राणी आपल्या जगात राहायला आला आहे . त्याचे गुणधर्म आणि इतर गोष्टी आम्हाला कळल्या की तुम्हाला सांगू .

२. काल रात्रीच तितीत नामक हिमालकडे ३ ग्राम बर्फाची चोरी झाली आणि त्या पिपाप नामक हिमिलाला १ वर्ष आर्टिफिशल बर्फ वापरण्याची शिक्षा मिळाली . 

३. काल पहिल्यांदाच एक मीनामाला आम्ही बघितलं . [ कदाचित त्यांची अदृश्य होण्याची शक्ती समाप्त होत अली असू शकते . ]

४. सर्वांचं असं बोलणं चालू आहे की इथे १० दिवसांनी [ जेम - तेम ] इथे शाळा नामक शिक्षणपद्धत जुन्या शिक्षणपद्धतीपेक्षा चांगली असल्याने [ संशोधक म्हणतात . ] ती येथे स्थापन करण्यात येत आहे . 

५. आज प्राणी संग्रहालयात मधमाशी आणि मुंगी हे दुर्मिळ प्राणी आणण्यात आले आहेत . [ हे कुठे सापडले ते सांगायला प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी सांगायला तयार होत नाहीयेत . ]